washim corona news today 13 Aug : वाशिम जिल्ह्यात आज ६७ व्यक्ती कोरोना बाधीत; एकुण संख्या १०८८ : आज २३ डिस्जार्च
washim corona news today 13 Aug
दि.१३ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ६७ व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १०८८ : आज २३ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.१३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ६७ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार २८ व्यक्ती तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार ३९ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात २३ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
दुपारी १२.०० वाजताचे वृत्तानुसार २८ बाधीत
वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील ३, काटीवेस परिसरातील ७, अनसिंग येथील १, साखरा येथील ३, पार्डी आसरा येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, देशमुख गल्ली येथील १, एकलासपूर येथील १, गोहगाव येथील २ , मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील ३, मुठ्ठा येथील २, शिरपूर जैन येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
संध्याकाळी ०७.०० वाजताचे वृत्तानुसार ३९ बाधीत
वाशिम शहरातील शिवप्रताप नगर येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७, शिरसाळा येथील २१, मंगरूळपीर येथील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील १, गायत्री मंदिर परिसरातील ५, किन्ही रोड बायपास परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, अमरावती येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील ७० वर्षीय व्यक्तीचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.
दिवसभरात २३ व्यक्तींना डिस्जार्च
मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, कारंजा लाड शहरातील विश्वभारती कॉलनी येथील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, हातोतीपुरा येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, भारतीपुरा येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील १, वाशिम शहरातील खतीबपुरा येथील १, इलखी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १०८८ ऍक्टीव्ह रुग्ण - ३७०
डिस्जार्च - ६९८ मृत्यू - १९ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment