washim corona news today 20 Aug : जिल्ह्यात आज २० व्यक्ती कोरोना बाधीत एकुण संख्या १३१७ : आज ११ डिस्जार्च; २ जणांचा मृत्यू
washim corona news today 20 Aug
दि.२० ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज २० व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १३१७ : आज ११ डिस्जार्च; २ जणांचा मृत्यू
गत काही दिवसात जिल्ह्याबाहेर २४ व्यक्ती कोरोना बाधीत
वाशिम (जनता परिषद) दि.२० - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दिवसभरात एकूण २० व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर दिवसभरात ११ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
२० व्यक्ती कोरोना बाधित
वाशिम शहरातील बाकलीवाल कॉलनी परिसरातील १, मानोरा तालुक्यातील चिखली येथील ४, आसोला येथील ३, सोमनाथनगर येथील २, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, भरजहांगीर, १ कारंजा लाड शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील २, साळीपुरा येथील २, रंगारीपुरा येथील २, भिलखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात ११ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील २, काटीवेस येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, मुठ्ठा येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेगी येथील १, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथील २, मानोरा तालुक्यातील बुंदी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील आखातवाडा येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्याबाहेर २४ कोरोना बाधित
गेल्या काही दिवसांत वाशिम जिल्ह्यातील २४ व्यक्ती जिल्ह्याबाहेर कोरोना बाधित आढळल्या आहेत. त्यापैकी ११ व्यक्तींना डिस्चार्ज मिळाला असून १३ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यांचा समावेश जिल्ह्याच्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीत करून जिल्ह्याची आकडेवारी अद्ययावत करण्यात आली आहे.
दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या वाशिम तालुक्यातील वारा जहांगीर येथील ६० वर्षीय महिलेचा काल, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी, तर ७ ऑगस्ट रोजी कोरोना बाधित आढळलेल्या कारंजा लाड तालुक्यातील सोहळ येथील ४० वर्षीय व्यक्तीचा आज पहाटे २ वा. दरम्यान उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १३१७ ऍक्टीव्ह रुग्ण - ३८५
डिस्जार्च - ९०९ मृत्यू - २२ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment