APMC'll be closed for 3 Days : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल लिलाव आदी सलग तिन दिवस राहणार बंद
कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल लिलाव आदी सलग तिन दिवस राहणार बंद
कारंजा (जनता परिषद) दि.२० - उद्या दिनांक २१ ऑगस्ट पासून तर २३ ऑगस्ट पर्यंत असे एकुण ३ दिवस कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल लिलाव आदी बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीेचे सचीव निलेश भाकरे यांनी दिली आहे.
उद्या दिनांक २१ ऑगस्ट शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ लि.पूणे यांनी दिलेले पत्रानुसार राज्यातील सर्वच बाजार समित्यांचा लाक्षणीक संप राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतीमालाचे लिलाव हे बंद राहणार आहेत.
शनीवार दि. २२ ऑगस्ट रोजी श्री. गणेश चतुर्थी असल्या कारणाने मार्केट बंद राहणार आहे. तर रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी साप्ताहिक सुटी असल्याने बाजार बंद राहणार आहे.
Post a Comment