Header Ads

washim corona news today 12 August : जिल्ह्याने पार केला १००० रुग्णांचा आकडा आज २३ पॉझिटिव्ह

breaking news, washim corona news today 12 Aug, karanja lad, mangrulir
washim corona news today 12 August
दि.१२ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्याने पार केला १००० रुग्णांचा आकडा
 आज २३ व्यक्ती पॉझिटिव्ह : एकुण संख्या १०२१ : आज ४७ डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.१२ - आज वाशिम जिल्ह्याने एकुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत १००० चा आकडा पार केला आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा आलेख हा वाढतच चालला असून रोजच मोठ्या संख्येत कोरोना बाधीत समोर येत आहेत. यामुळे जिल्हावासीयांनी जास्त काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 
आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण २३ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार ७ व्यक्ती तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार १६ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात ४७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

दुपारी १२.०० वाजताचे वृत्तानुसार ७ बाधीत

मंगरूळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, शेगी येथील ५ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ०६.३० वाजताचे वृत्तानुसार १६ बाधीत

सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील १, हयातनगर येथील १, सोहळ येथील १, कामरगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १, शिरसाळा येथील ८, रिसोड तालुक्यातील गोहगाव येथील १, एकलासपूर येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ४७ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरातील २, अल्लाडा प्लॉट ३, टिळक चौक २, गवळीपुरा ३, सोंडा येथील १, अनसिंग येथील १६, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, सिद्धार्थ विद्यालय परिसरातील १, कवठळ येथील ४, शेलूबाजार येथील ४, शेंदूरजना मोरे येथील १, रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, हराळ येथील ३, कारंजा लाड येथील सिंधी कॅम्प येथील २, दिल्ली वेस परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १०२१ ऍक्टीव्ह रुग्ण - ३२७
        डिस्जार्च - ६७५         मृत्यू - १८ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.