News Karanja lad today 12 Aug : वंचित बहुजन आघाडी चे लाॅकडाऊन च्या विरोधात डफडे बजाव आंदोलन
कारंजा मध्ये वंचित बहुजन आघाडी चे
लाॅकडाऊन च्या विरोधात डफडे बजाव आंदोलन
कारंजा (का.प्र.) दि.१२ - लाॅकडाऊन च्या विरोधात वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ कारंजा शहर व तालुक्याच्या वतिने डफडे बजाव आंदोलन कारंजा बस डेपो समोर करण्यात आले. तात्काळ बस सेवा चालु करणे, सर्व ट्रान्सस्पोट चालु करणे, सर्व दुकानांने खुले करणे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे हे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाले.
राज्यात सर्वत्र हे आंदोलन करण्यात येत आहे. सर्व सामान्य माणसाला जिवन जगायचे तरी कसे. सर्व राज्यात बेरोजगारी पसरली आहे.त्यामुळे हे लाॅकडाऊन त्वरीत खुले करावे अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भारत भगत यांनी प्रशासनाला केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष भारत भगत, शहराध्यक्ष देवराव कटके, अरूण ठाकरे, राजाभाऊ चव्हान, सिद्धार्थ देवरे, शेषराव चव्हान, सचिन खांडेकर, देवानंद कांबळे, किशोर उके, प्रमोद लळे, किशोर ढाकुलकार, समाधान सिरसाठ, सदानंद कटके, बबन वानखडे, राजु खंडारे, दिपक वानखडे, शरद इंगोले, दिलीप रोकडे, देविदास गजभिये, चंद्रमणी लांजेवार. आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment