Header Ads

washim news today 11 Aug : जिल्ह्यात आज ४२ व्यक्ती पॉझिटिव्ह, एकुण संख्या ९९८ वर; ५० जणांना डिस्जार्च

washim corona news today 11 Aug : karanja lad, malegaon, risod, mangrulpir
washim news today 11 August
दि.११ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ४२ व्यक्ती पॉझिटिव्ह
 एकुण संख्या पोहोचली ९९८ वर; ५० जणांना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.११ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ४२ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार २७ तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार १५ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. तर दिवसभरात ५० व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

दुपारी १२.०० वाजताचे वृत्तानुसार २७ बाधीत

काल रात्री उशिरा व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार मंगरूळपीर शहरातील बालाजी मंदिर परिसरातील ३, कवठळ येथील ७, शेगी येथील ७, कारंजा लाड तालुक्यातील आखतवाडा येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, एकलासपूर येथील ४, वाशिम शहरातील काळे फाईल येथील २, पार्डी आसरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

संध्याकाळी ०६.३० वाजताचे वृत्तानुसार १५ बाधीत

आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील जिजाऊ नगर परिसरातील २, मंगरूळपीर शहरातील जैन मंदिर परिसरातील १, शेगी येथील ४, वाशिम शहरातील गणेशपेठ येथील १, झाकलवाडी येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरसाळा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, सोहळ येथील १, आखतवाडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ५० व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील सप्तशृंगी नगर येथील २, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, गवळीपुरा येथील १, मंगरूळपीर शहरातील अकोला रोड परिसरातील १, जांब येथील १, मालेगाव तालुक्यातील काळा कामठा/पिंपळदरा येथील १, रिसोड शहरातील जुनी सराफा लाईन येथील ५, गणेशनगर येथील २, ब्राह्मण गल्ली येथील १, पठाणपुरा येथील १, कायंदे सदन परिसरातील १, हराळ येथील ४, भोकरखेड येथील २, कारंजा लाड शहरातील हातोतीपुरा येथील ७, भारतीपुरा येथील २, मजीदपुरा येथील ६, सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील ३, रामा सावजी चौक परिसरातील २, कानडीपुरा येथील १, रविदासनगर येथील १, भामदेवी येथील ३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ९९८ ऍक्टीव्ह रुग्ण - ३५१
डिस्जार्च - ६२८ मृत्यू - १८ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.