MNS Karanja lad news : शालेय फी वाढ व पालकांना पैसे मागणीच्या होणार्या त्रासाबद्दल कारंजा मनसे आक्रमक
शालेय फी वाढ व पालकांना पैसे मागणीच्या होणार्या त्रासाबद्दल कारंजा मनसे आक्रमक
शिक्षण विभागाने त्वरीत सुचनापत्र काढून विद्याथी व पालकांना दिलासा देण्याची मागणी
अन्यथा....मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा शिक्षण विभागाला इशारा
कारंजा (जनता परिषद) दि.११ - शालेय फी वाढ व पालकांना पैसे मागण्यामुळे होणार्या त्रासाबद्दल कारंजा मनसे आक्रमक झाली असून याबाबत आज मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना शासनाचे निर्देशांचे विरोधात जाऊन अनावश्यक त्रास देणार्या खाजगी शाळांबाबत व त्यांनी लावलेल्या पैशांच्या तगाद्याबद्दल जाब विचारुन त्रास थांबवावा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा ईशाराही यावेळी निवेदनाचे माध्यमाने मनसेने दिला.
कोरोना ह्या विश्वव्यापी समस्येमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही खोळंबली आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली असून छोटे व्यवसाय हे बंद पडण्याचे मार्गावर येऊन ठेपले आहेत. शालेय शिक्षण कोरोना मुळे सुरु होईल किंवा नाही याची काही शाश्वती नाही. तरी कारंजा व वाशिम जिल्ह्यातील काही खाजगी शाळांकडून विद्यार्थी व त्यांचे पालकांना पैशांचे संदर्भात सुचना पाठविल्या जात आहेत.
शासनाने वेळोवेळी आदेश काढून पालकांना विनाकारण पैशासाठी त्रास देऊ नये असे निर्देश दिले असूनही शाळा व्यवस्थापन ह्या आदेशांची उघड पायमल्ली करीत असल्याचे दिसून येते आहे. अनेक पालकांनी आपलेशी संपर्क साधून विविध शाळांचे वतीने देण्यात येणार्या त्रासाबद्दल पाढा वाचल्याचे सांगितले. तसेच काही पालक इतके त्रस्त झाले आहेत की आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही असेही बोलत असल्याचा उल्लेख या निवेदनातून देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचा कामधंदा नसतांना खाजगी शाळांचे वतीने देण्यात येणार्या या त्रासामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी शिक्षण विभाग व अधिकारी वर्ग त्याला जबाबदार राहतील असा स्पष्ट ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सर्वसाधारण विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने खाजगी शाळांना फी वाढ संदर्भात व पैसे भरण्याचे संदर्भात त्वरीत सुचनापत्र काढून दिलासा द्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व होणार्या घटनेस शिक्षण विभाग व अधिकारी जबाबदार राहतील असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांच्या नेतृत्वात मनेसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांना हे निवेदन दिले. यावेळी मनविसे जिल्हा उपसंघटक कपील महाजन, अमोल अघम, तालुका संघटक भालचंद्र शामसुंदर, मनविसे शहर उपाध्यक्ष इशांत देशमुख, मनसे वाहतूक संघटक अरुन बिकट, भारत हांडगे, गगन राय, शेखर जिरापूरे, रवी राऊत उपस्थित होते.
खाजगी शाळांचे हे वर्तन असहनीय व अमानवीय - अमोल लुलेकर, मनसे उपजिल्हा प्रमुख
मनसे नेहमीच अन्यायाचे विरोधात व जनसामान्यांचे प्रश्नांसाठी उभी ठाकली आहे. कोरोनाच्या या काळात जेव्हा प्रत्येक व्यक्तीची आर्थीक बाजू ही ढासळलेली आहे अशावेळेस खाजगी शाळांनी फि वाढ करणे व पालकांचे मागे पैशांसाठी तगादा लावणे हे असहनीय असेच आहे असे मत मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी व्यक्त केले.
Post a Comment