Washim Corona News Today 14 Aug : वाशिम जिल्ह्यात आज ४१ व्यक्ती कोरोना बाधीत; एकुण संख्या ११२९ : आज ३५ डिस्जार्च
एकुण संख्या ११२९ : आज ३५ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.१४ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ४१ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. यामध्ये दुपारी प्राप्त अहवालानुसार ९ व्यक्ती तर संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार ३२ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात ३५ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
दुपारी ११.३० वाजताचे वृत्तानुसार ०९ बाधीत
काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७ व कारंजा लाड तालुक्यातील कामरगाव येथील लाकडीपुरा परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
संध्याकाळी ०६.३० वाजताचे वृत्तानुसार ३२ बाधीत
वाशिम शहरातील पतंजली चिकित्सालय परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, ज्ञेश्रहळ परिसरातील १, रिसोड शहरातील एकटा नगर येथील १, आसेगाव पेन येथील १, चिंचाबाभर येथील २, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १२, मंगरुळपीर तालुक्यातील गिंभा येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिवाजीनगर येथील १, आखतवाडा येथील ५, मोरंबी येथील १, सोहळ येथील ३ आणि भिलडोंगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात ३५ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील ८, टिळक चौक येथील १, अनसिंग येथील ३, मंगरुळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील ४, शिवाजीनगर येथील ३, कवठळ येथील १, कारंजा लाड शहरातील माळीपुरा येथील ३, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प परिसरातील १, भामदेवी येथील १, कामरगाव येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, पोहा येथील ३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Post a Comment