Header Ads

washim news today 16 Aug : Bail Pola, Tanha Pola prohibited to celebrate in public

bail pola, marbat, tanha pola, pola festival, पोळा, तान्हा पोळा, मारबत
washim news today 16 Aug : Bail Pola, Tanha Pola prohibited to celebrate in public
पोळा, मारबत व तान्हा पोळा सण
सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यास मनाई

          वाशिम, दि. १६ : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात सर्व प्रकारचे उत्सव, मेळावे आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे १८ ऑगस्ट २०२० रोजी होणारा पोळा, १९ ऑगस्ट २०२० रोजी मारबत व तान्हा पोळा हे सण सार्वजनिक स्वरुपात साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही गावात, शहरात बैलपोळा भरविण्यात येवू नये अथवा मिरवणूक काढण्यात येवू नये, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

          कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे उत्सव, कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नसल्याने कोरोना विषाणूचा संसर्गाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पोळा, मारबत व तान्हा पोळा हे सण सार्वजनिक स्वरुपात साजरे न करता, हे सण घरगुती स्वरुपात वैयक्तिकपणे साजरे करावेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलाम १८८ तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.