Header Ads

Bhumiputra Shetkari Sanghatna Risod : वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी रास्ता रोको

Bhumiputra Shetkari Sanghatna Vishupant Bhutekar Risod washim

वाशीम रिसोड रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करण्यासाठी भूमिपुत्र करणार रास्ता रोको 

          वाशीम (का.प्र.) दि. २६ -  रिसोड ते वाशीम रस्त्याचे नूतनीकरण सुरु असतांना कंत्राटदाराकडून अचानक काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.  बंद केलेले काम पूर्ववत सुरु करून तात्काळ सुरु करावे यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक  ३ सप्टेंबर रोजी आसेगाव-कोयाळी फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. 
            नोकरी व व्यापाराच्या दृष्टीने रिसोड ते वाशीम ये जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे मात्र जिल्हा मुख्यालयाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल गॉट आहेत. त्यामुळे हे रखडलेले रस्त्याचे काम पूर्ववत सुरु करावे, खोदून पडलेल्या रस्त्याकडे कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे याची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, व काम चालू असतांना पर्यायी मार्ग व्यवस्थित ठेवण्याची जबादारी निश्चित करण्यात यावी. या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना रास्तारोको आंदोलन करणार आहे. 
   आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, रिसोड तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरे, वाशीम तालुकाध्यक्ष संतोष सुर्वे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत 
        या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भूमिपुत्राचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु यांनी केले आहे 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.