Naxals attack police in Gadchiroli district; 1 Police Martyr
Naxals attack police in Gadchiroli district
गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांवर नक्षलवाद्यांचा हल्ला; एक पोलिस शहीद
गडचिरोली दि.१४ - आज जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात कोठी या गावात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलिस शहीद तर एक जखमी झाला आहे. शहीद झालेल्या पोलिसाचे नांव दुष्यंत नंदेक्ष्वर असून त्यांचा सहकारी पोलिस दिनेश भोसले हा जखमी झाला आहे.
आज सकाळी ८.३० चे सुमारास हे दोन्ही पोलिस किराणा सामान आणणेसाठी दुकानात गेले असतांना तेथे २-३ नक्षलवाद्यांनी दोन्ही पोलिसांवर गोळीबार केला. हे दोन्ही पोलिस कोठी येथील पोलिस मदतकेंद्रात ड्युटीवर होते.
Post a Comment