amit shah tested negative for coronavirus : अमित शाह यांनी केली कोरोनावर मात
amit shah beats corona,
amit shah tested negative for coronavirus
अमित शाह यांनी केली कोरोनावर मात
नवी दिल्ली दि.१४ - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करीत ही माहिती दिली. तसेच सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी त्यांनी स्वत: त्यांच्या ट्विटरहून सर्वांना धन्यवाद दिले.
ट्वीट द्वारे ते म्हणाले की, आज माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला. माझ्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जे केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो.
२ ऑगस्ट रोजी अमीत शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करीत ही माहिती दिली होती.
Post a Comment