MahaDBT scholarship amount in the student's account started : शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु
Proceedings to deposit the scholarship amount in the student's account started
शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु
वाशिम, दि. २4 (जिमाका) : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेलेया योजनांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अर्ज स्वीकारण्याची सुविधा ३ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आली होती, सन २०१९-२० मधील विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी १७ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. सदर अर्जावर वाशिमचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे मान्यता प्रदान केल्यानंतर आयुक्तालय स्तरावरून (डीडीओ) त्यांचे देयक तयार करून कोषागारातून देय असलेली रक्कम पारित करून महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Poratl) च्या पूल बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे.
सदर रक्कम पीएफएमएस या केंद्रीभूत वितरण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा होणे अपेक्षित आहे. तद्पुर्वी पीएफएमएस प्रणालीमधून वितरण करण्यापूर्वी लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्यास असल्याची पडताळणी एनपीसीआय या केंद्रीभूत पडताळणी प्रणालीद्वारे केली जाते. तथापि, या पडताळणी प्रक्रियेस विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने समाज कल्याण आयुक्तालय स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयास तसेच राज्यस्तरावरील पीएफएमएस व एनपीसीआय कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. याशिवाय देयक जनरेट झालेल्या पैकी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वितरण सद्यस्थितीत महाडीबीटी प्रणालीवरील पूल अकौंट व पीपीएमएस या प्रणालीद्वारे चालू असून सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम आधारसंलग्न बँक खात्यात अद्याप जमा व्हायची आहे.
शिष्यवृत्ती प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य, क्लार्क लॉगीनमधून तपासावेत
नॉन आधार अर्ज नोंदणी केलेल्या अर्जामध्ये आधारक्रमांक अद्ययावत नसणे, विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न नसणे, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनअॅक्टिव्ह असणे, विद्यार्थ्यांनी व्हाउचर रिडिम न करणे, विद्यार्थ्यांचे आधार संलग्न असलेले बँक खाते बंद असणे, विद्यार्थ्यांचा आधार संलग्न मोबाईल क्रमांक बंद असणे, दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांची उपस्थिती अद्ययावत करण्याकरिता अर्ज प्रलंबित असणे आदि कारणांमुळे रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे वितरीत होण्यास विलंब होत असल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांच्याबाबतीत सर्व महाविद्यालयांनी प्राचार्य अथवा क्लार्क लॉगीनमधून संबंधित विद्यार्थ्याचा शैक्षणिक अर्ज क्रमांक नमूद करून सदर अर्ज तपासून घ्यावा, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.
Post a Comment