मंत्रीमंडळ निर्णय : शहरी भागात आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणेस ६ पदांची निर्मिती
Cabinate Decision : 6 Posts for Health Dept in Urban Areas
शहरी भागात आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणेस ६ पदांची निर्मिती
नवीन यंत्रणेत आरोग्य सेवा संचालकांचे पद
मुंबई (महासंवाद) दि.२६ - आज झालेल्या मंत्रीमंडळाचे बैठकीत शहरी भागासाठी आरोग्य विषयक कार्यक्रम ठोसपणे राबविण्याचे दृष्टीकोणातून ६ जणांचा समावेश असणार्या नवीन यंत्रणेेची निर्मितीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शहरी भागासाठीचे आरोग्य सेवा संचालकांचे पदासह आरोग्य सेवा (शहरी), उपसंचालक २ पदे, सहायक संचालक ४ पदे अशी ही नवीन यंत्रणा राहणार आहे.
राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी तसेच स्थानीक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील.
Post a Comment