दि.०६ जुलै : वाशिम संध्याकाळचे अहवालात ५ पॉझिटिव्ह
दि.०६ जुलै : वाशिम संध्याकाळचे अहवालात ५ पॉझिटिव्ह
वाशिम (जनता परिषद) दि.०६ - आज संध्याकाळी ६.०० वाजता प्राप्त कोरोना चाचणी विषयक अहवालांनुसार, जिल्ह्यातील २० प्राप्त अहवालांमध्ये ५ व्यक्ती हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
वाशिम शहरातील ४ व्यक्तींचा यांत समावेश असून काळे फैलातील ४७ वर्षीय महिला, गवळीपुरा येथील १९ वर्षीय युवक व ४० वर्षीय महिला तसेच विनायक नगर येथील ३९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
मानोरा तालुक्यातील ग्राम चौसाळा येथील २५ वर्षीय महिलेचा या ५ मध्ये समावेश आहे.
यामुळे आता वाशिम जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकुण संख्या ही ११५ झाली आहे. दरम्यान, आज सकाळी १२ जणांना डिस्जार्च देण्यात आला. यांत वाशिम येथील ६, मानोरा ४, कारंजा शहर १ व किनखेड ता. कारंजा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.
दरम्यान, अकोला येथे रुग्णालयात दाखल असलेला मालेगांव येथील १ व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे अकोला येथे निदान झाले आहे.
Post a Comment