अनेकोंची नाराजी कारंजाचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांना भोवली; हिंगोली ला बदली : दादाराव डोल्हारकर पुन्हा एकदा कारंजाचे मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार
अनेकोंची नाराजी कारंजाचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांना भोवली; हिंगोली ला बदली
दादाराव डोल्हारकर पुन्हा एकदा कारंजाचे मुख्याधिकारी म्हणून रुजू होणार
कारंजा (जनता परिषद) दि.०६ - अनेकोंची नाराजी ओढवून घेणार्या कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची हिंगोलीचे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर कारंजाचा पुर्वानुभव असलेले दादाराव डोल्हारकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहे.
आजच नगर विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे बदल्यांचे विनीयमन सह शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणार्या बिलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ चे कलम ४(४) तसेच ४(५) मधील तरतुदीनुसार प्रशासकीय कारणारस्तव बदली करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आजच दि.०६ जुलै रोजी सध्याचे पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले असून उद्या दि. ०७ जुलै रोजी तात्काळ पदावर रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड विचारात घेऊन त्याबाबतच्या उपाय योजनांचा भाग म्हणून सदर आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
विशेेष म्हणजे २९ जुन रोजी पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी कंटोन्मेंट झोन ला कारंजा येथे भेट दिली असता, शहराचे पालक संस्थेचे मुख्य अधिकारी असलेले डॉ.अजय कुरवाडे यांनी मारलेली दांडी हा मोठा चर्चेचा विषय झाला होता. तसेच नगर परिषदचे अध्यक्ष, विविध विभागांचे सभापती व न.प.सदस्यांसह अनेको सामान्य नागरिकांनीही पालकमंत्री यांच्यासमक्ष निवेदनाद्वारे त्यांच्या कामकाजा बद्दल अनास्थेचा पाढाच वाचला होता.
Post a Comment