Header Ads

washim news कोरोनाची लक्षणे असलेल्याने 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' करून घ्यावी rapid antigen test

washim corona news collector Hrushikesh Modak


कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' करून घ्यावी 

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आवाहन

प्रत्येक तालुक्यात अँटीजेन टेस्ट सेंटर कार्यान्वित


     वाशिम, दि. २१ (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट (rapid antigen test) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता प्रत्येक तालुक्यात एक अँटीजेन टेस्ट सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी अशी लक्षणे असलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने आपली अँटीजेन टेस्ट करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक (washim collector Mr.Hrushikesh Modak) यांनी केले आहे.

     कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत सातत्याने करण्यात येत आहे.

     कोरोना संसर्गाचे लवकर निदान व्हावे, यासाठी आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना स्वतःहून जावून याठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वा. दरम्यान आपली कोरोना विषयक चाचणी करून घेता येईल. या चाचणीचा अहवाल अर्धा ते एक तासांत प्राप्त होईल. तरी कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी अँटीजेन टेस्ट सेंटरला जाऊन टेस्ट करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे. तसेच अशी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक मदत हवी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


खालील ठिकाणी करता येईल रॅपिड अँटीजेन टेस्ट


१. जिल्हा स्त्री रुग्णालय, चिखली रोड, वाशिम
२. उपजिल्हा रुग्णालय, कारंजा लाड
३. अनुसूचित जाती मुलांची निवासी शाळा, सवड, ता. रिसोड
४. अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, तुळजापूर, ता. मंगरुळपीर
५. ग्रामीण रुग्णालय, मालेगाव
६. ग्रामीण रुग्णालय, मानोरा

No comments

Powered by Blogger.