Header Ads

20 July washim corona news today : दि.२० जुलै - वाशिम जिल्ह्यात २५ व्यक्ती कोरोना वायरस ने संक्रमीत

washim Corona news karanja news

20 July Washim Corona News

दि.२० जुलै : वाशिम जिल्ह्यात आज २५ व्यक्ती कोरोना वायरस ने संक्रमीत

आज ३६ जणांना डिस्जार्च तर एकुण संख्या पोहोचली ३९१ वर 


सद्यस्थिती :--- एकूण पॉझिटिव्ह - ३९१  
ऍक्टिव्ह - १८७ डिस्चार्ज - १९५ मृत्यू ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कारंजा (जनता परिषद) दि.२० - आज वाशिम जिल्ह्यात एकुण २५ व्यक्ती कोरोना बाधीत आल्याने एकुण कोरोना बाधीतांची संख्या ही ३९१ वर पोहोचली आहे. आज बाधीत व्यक्तींमध्ये तालुकाप्रमाणे रिसोड - ११, मंगरुळपीर - ६, कारंजा -४, वाशिम-३ व मालेगांव-१ अशी संख्या आहे. 

यामुळे एकुण कोरोना वायरस ने संक्रमीतांची आजवरची जिल्ह्याती व्यक्तींची संख्या ही ३९१ वर पोहोचली असून यांतील १८७ ऍक्टीव्ह रुग्ण असून १९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ह्या आकडेवारीमध्ये जिल्ह्यातील तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या व्यक्तींचाही समावेश आहे. 

आज सायंकाळी ७.०० वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजचे रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जिल्ह्यात १७ व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या आहेत. यामध्ये मांगवाडी, रिसोड येथील १०, मंगरूळपीर शहरातील बढाईपुरा परिसरातील ३, आसेगाव (ता. मंगरूळपीर) येथील १, कारंजा लाड शहरातील दिल्ली वेस परिसरातील १ व नगरपरिषद परिसरातील १ आणि वाशिम शहरातील ध्रुव चौक परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे. सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत.

तर दुपारी १.३० वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा ३६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर ८ व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.

रिसोड शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील १, शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १ व अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील १ व पठाणपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बरे झालेल्या ३६ जणांना डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणार्‍या ३६ व्यक्तींना उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामध्ये मालेगाव शहरातील ४, मंगरूळपीर शहरातील ११, कारंजा लाड येथील १० व हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

No comments

Powered by Blogger.