Header Ads

१ जुलै : वाशिम जिल्ह्यात कोरोनाने गाठली शंभरी

१ जुलै : वाशिम जिल्ह्यात कोरोनाने गाठली शंभरी 

रात्री उशीरा वाशिम येेथे ३ तर दुपारी मंगरुळ येथे ४ पॉझिटिव्ह 

वाशिम (जनता परिषद) दि.०१ - शेवटी आज अमरावती विभागातून एकट्याच शिल्लक राहिलेल्या वाशिम जिल्ह्यानेही कोरोना रुग्णांच्या संख्येची शंभरी गाठली. आज सकाळी प्राप्त माहितीनुसार, उशीरा रात्री वाशिम येथील तिन जणांचा तर दुपारी प्राप्त माहितीनुसार, मंगरुळपीर येथील ४ जणांचा कोरोना विषयक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे आता जिल्ह्यात एकुण रुग्ण संख्या ही १०१ इतकी झाली आहे. तर जिल्ह्याबाहेर पॉझिटिव्ह आलेल्या व जिल्ह्यात उपचार घेणार्‍या २ जणांचा विचार केल्यास ही संख्या १०३ इतकी होते. 

आज दुपारी प्राप्त जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ११ जणांच्या पाठविलेल्या अहवालात इतर ७ हे निगेटिव्ह तर ४ पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरुळपीर येथील बिलालनगर भागातील एक व्यक्ती जो अकोला येथे पॉझिटिव्ह म्हणून आला होता त्याचे संपर्कातील ४ जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेत. एकाच कुटुंबातील ३७ वर्षीय पुरुष, ६५ व ३२ वर्षीय महिला व ७ वर्षीय मुलाचा यांत समावेश आहे. 

तर सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुन रोजी रात्री उशीरा वाशिम येथे ३ जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. यांत अल्लाडा प्लॉट परिसरातील २४ वर्षीय महिला, राबळे नगर परिसरातील एक व सिव्हील लाईन परिसरातील एक अशा दोन २० वर्षीय युवकांचा समावेश आहे. महिला ही यापुर्वीचे बाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहे तर इतर दोन्ही युवक हे परदेशातून परतले आहेत. 

यामुळे आता जिल्ह्यातील एकुण रुग्णांची संख्या ही १०१ झाली असून ७६ रुग्ण हे बरे झाल्याने डिस्जार्च देण्यात आलेला आहे तर २५ हे ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. 

No comments

Powered by Blogger.