Header Ads

washim corona news : दि.२८ जुलै - जिल्ह्यात आज ८ व्यक्ती पॉझिटिव्ह; एकुण ५३९ ; आज ९ डिस्जार्च

washim corona news 28 July 8 Positive 9 Discharge
दि.२८ जुलै - जिल्ह्यात आज ८ व्यक्ती पॉझिटिव्ह 
एकुण संख्या झाली ५३९ ; आज ९ जणांना डिस्जार्च 

वाशिम (जनता परिषद) दि.२८ - आज जिल्ह्यात दुपारी २ व संध्याकाळी ६ असे ८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार आजपावेतो कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील एकुण संख्या ही ५३९ वर पोहोचली आहे. बरे झालेल्या ९ जणांना आज डिस्जार्च देण्यात आला. 

दुपारी ११.३० चे वृत्तानुसार, २ पॉझिटिव्ह 

कारंजा लाड तालुक्यातील मोहगव्हाण येथील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सदर व्यक्ती मुंबई येथून परतला आहे. तसेच मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील ६ वर्षीय मुलगा कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असून तो यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.

संध्याकाळचे ७.०० चे वृत्तानुसार, ६ पॉझिटिव्ह

आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कारंजा लाड शहरातील कांदीपुरा येथील १, वाशिम शहरातील नर्सिंग कॉलेज परिसरातील १, मालेगाव शहरातील अकोला फाटा परिसरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १ व तपोवन येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच अकोला येथे उपचार घेत असलेला कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज बरे झालेल्या ९ जणांना डिस्जार्च 

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये  वाशिम शहरातील विनायक नगर येथील १  व पोलीस निवासस्थान येथील १, आडगाव येथील १, इलखी येथील २, मंगरूळपीर शहरातील पठाणपुरा येथील १ व गवळीपुरा येथील १, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड तालुक्यातील शिवनगर येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

सद्यस्थिती :   एकूण पॉझिटिव्ह  ५३९     ऍक्टिव्ह  २०२       
        डिस्चार्ज  ३२७                मृत्यू  १०
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.