Header Ads

Maharshtra SSC Result 2020 : दहावीचा निकाल २०२० : राज्याचा निकाल ९५.३०% कोकण मंडळ सर्वप्रथम ९८.७७%

maharashtra ssc result 2020

दहावीचा निकाल २०२० : राज्याचा निकाल ९५.३०% 
कोकण मंडळ सर्वप्रथम ९८.७७% 

वाशिम (जनता परिषद) दि.२९ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षांचा निकाल आज दुपारी १.०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 
तत्पुर्वी राज्याचा एकंदरीत निकाल समोर आला असून दहावी परिक्षांचा राज्याचा निकाल हा एकूण ९५.३३% लागला असून राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान ९८.७७% निकालासह  कोकण ह्या विभागीय मंडळाने पटकाविला आहे. मागील वर्षी निकाल हा ७७.१०% इतका लागला होता. मागील वर्षी निकाल हा ८ जुन रोजी लागला होता. गुणानुक्रमे विभागीय मंडळांची निकालाची टक्केवारी ही पुढील प्रमाणे आहे. 
१) कोकण विभाग -  ९८.७७%   २) कोल्हापुर विभाग - ९७.६४% ३) पुणे विभाग - ९७.३४% ४) मुंबई विभाग -  ९६.७२% ५) अमरावती विभाग -  ९५.१४% ६) नागपूर विभाग -  ९३.८४% ७) नाशिक विभाग -  ९३.७३%  ८) लातूर विभाग -  ९३.०७%   ९) औरंगाबाद विभाग -  ९२.००%
राज्यातून पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली ९६.९१% विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९३.९०% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत मुलींची निकालाची टक्केवारी ही मुलांपेक्षा ३.०१% जास्त आहे
लागलेला निकाल खाली दिलेल्या ४ संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे तसेच तेथून डाऊनलोडही करता येणार आाहे. 





मार्च २०२० मध्ये राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ३ मार्च ते २३ मार्च ह्या दरम्यान परिक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र कोरोना या वैश्‍विक महामारीच्या पार्श्‍वभूमीवर घोषीत लॉकडाऊन मुळे हे निकाल चांगलेच लांवणीवर पडले होते. तसेच भूगोलाचा शेवटचा पेपरही कोरोेनामुळे रद्द करण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.