Header Ads

washim corona news : दि.१९ जुलै : आज दिवसभरात एकुण १५ व्यक्ती कोरोना बाधीत : १८ जणांना डिस्जार्च तर १ व्यक्ती चा मृत्यू

दि.१९ जुलै : आज दिवसभरात एकुण १५ व्यक्ती कोरोना बाधीत 
१८ जणांना डिस्जार्च तर १ व्यक्ती चा मृत्यू 


-----: सद्यस्थिती :-----


एकुण पॉझिटिव्ह : ३६६ ऍक्टीव्ह रुग्र : १९८
डिस्जार्च : १५९ मृत्यू : ९


वाशिम (जनता परिषद) दि.१९ - आज दिनांक १९ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकुण १५ व्यक्ती ह्या कोरोना बाधीत आलेल्या आहेत. यामध्ये मंगरुळपीर शहरातील ७ व्यक्तींसह वाशिम येथील १, कारंजा शहरातील २, रिसोड शहरातील ४ तर मालेगांव तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. 

संध्याकाळी ७.३० वाजता चे वृत्त : मंगरुळ मध्ये ७ पॉझिटिव्ह 

संध्याकाळी उशीरा ७० व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेत. यामध्ये ६३ अहवाल हे निगेटिव्ह असून उर्वरित ७ पॉझिटिव्ह आले असून ते सर्व यापुर्वीच्या बाधीताच्या संपर्कातील आहेत. यामध्ये मंगरुळपीर शहरातील काझीपुरा येथील ३, टेकडीपुरा येथील ३ व पठाणपुरा येथील १ व्यक्तीचा समावेश आहे. 

संध्याकाळी ६.०० वाजता चे वृत्त : ७ पॉझिटिव्ह तर १ मृत्यू 

आज दुपारी प्राप्त अहवालानुसार, रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३ व गजानन महाराज मंदिर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील साई नगर परिसरातील २ आणि वाशिम शहरातील फकीरपुरा परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अकोला येथे उपचार घेत असलेल्या मालेगाव व मंगरुळपीर येथील व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या मालेगाव येथील महिलेचा उपचारा दरम्यान काल, १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वा. दरम्यान जिल्हा कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. सदर महिलेला न्यूमोनिया होता.

दुपारी १२.३० प्राप्त वृत्त : १ बाधीत तर १६ जणांना डिस्जार्च 

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. सदर व्यक्ती यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील १६ जणांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये वाशिम शहरातील बिलाला नगर येथील १, गंगू प्लॉट येथील ६, माधवनगर येथील २, ध्रुव चौक परिसर येथील १, तोरणाळा (ता. वाशिम) येथील १, हिवरा रोहिला (ता. वाशिम) येथील २, मंगरूळपीर शहरातील १, आंचळ (ता. रिसोड) येथील १ व रिसोड शहरातील इंदिरा नगर येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.


No comments

Powered by Blogger.