Header Ads

आज कारंजा झाले कोरोनामुक्त : सर्वांचे सहकार्य, मात्र सावध राहणे गरजेचे - तहसिलदार मांजरे : प्रशासन, व्यापारी व सर्वात महत्वाचे जनतेचे प्रयत्न सफल

आज कारंजा झाले कोरोनामुक्त 

सर्वांचे सहकार्य, मात्र सावध राहणे गरजेचे - तहसिलदार मांजरे

शहर व ग्रामीण भागीतील १-१ व्यक्तीही आज परतले 

प्रशासन, व्यापारी व सर्वात महत्वाचे जनतेचे प्रयत्न सफल 

 

कारंजा (जनता परिषद) दि.०६ - आज कारंजा शहरातील एक व तालुक्यातील ग्राम किनखेड येथील एक असे  एकुण २ कोरोना झालेले रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्जार्च देण्यात आला, यासोबतच कारंजा शहर व तालुका आता कोरोनामुक्त झाले आहे. 
४ जुन रोजी कारंजा तालुक्यातील ग्राम दादगांव येथे सर्वप्रथम एक महिला ही कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले होते. तर १० जुन पर्यंत नावालाही कोरोनाचा रुग्ण नसलेल्या कारंजात शहरात ११ जुन रोजी शहरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. सर्वात वाईट म्हणजे १७ जुन रोजी कोरोनामुळे शहरातील एका महिलेचा उपचारा दरम्यान अकोला येथे मृत्यू झाला होता. यानंतर तालुक्यातील तब्बल २९ जणांना कोरोनाची लागण झाली. यांतील २७ जणांना बरे झाल्यामुळे यापुर्वीच डिस्जार्च मिळाला होता. तर आज रोजी कारंजा शहरातील १ व कारंजा ग्रामीण भागातील किनखेड येथील एका रुग्णाला डिस्जार्च देण्यात आला. यामुळे आज कारंजा शहर व तालुका हे कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा प्राप्त झाला असून प्रशासन देखील सुखावले आहे. 

कारंजात कोरानाचा प्रसार होऊ नये, यासाठी महसुल, पोलिस, आरोग्य व नगर परिषद विभागांनी जिवाचे रान केले होते. कारंजाचे व्यापारी यांनी स्वत: समोर येत कोरोनाचा संपर्काने संसर्ग होऊ नये यासाठी प्रथम ४ व नंतर ३ असे ७ दिवस संपूर्ण कारंजात बंदचे आवाहन केले व पाळले देखील. विशेषत: बहुतांश जनतेनेही प्रशासनाचे वेळोवळचे निर्देशांचे पालन केले तसेच व्यापर्‍यांच्या बंद ला ओ देत कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात मोलाची भुमीका पार पाडली. 

सर्वांचे सहकार्याने साधले : मात्र तरीही जनतेने सावध राहणे गरजेचे - तहसिलदार 

आरोग्य विभागाने केलेले योग्य निदान, पोलिस यंत्रणेने ठेवलेले नियंत्रण, नगर परिषदने घेतलेली दक्षता तसेच संपुर्ण प्रशासनातील प्रत्येक घटकाने केलेले आपले कर्तव्य यामुळे आज कारंजा हे कोरोनामुक्त झाले असे मत तहसिलदार धिरज मांजरे यांनी व्यक्त केलेे आहे. कारंजातील व्यापार्‍यांनी दिलेले सहकार्य व सर्वात महत्वाचे म्हणेज जनतेने वेळोवळी दिलेले निर्देशांचे व ठेवलेले बंदचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग होण्यापासून बचाव झाला असेही मत यावेळी मांजरे यांनी बोलतांना व्यक्त केले. 
     कारंजा शहर व तालुका हे कोरोनामुक्त झाले असले ही आनंदाची बाब असली तरी त्याचा धोका काही कमी झालेला नाही, नागरिकांनी या रोगाची वाढ होऊ नये यासाठी स्वत:हून सुरक्षेसाठी दिलेले निर्देशांचे पालन करणे गरजेेच आहे असे आवाहनही त्यांनी केले. तसेच कोणाला कोरोना तत्‌सम लक्षणे आढळल्यास ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर व्हाटसऍप द्वारे माहिती द्यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.