Header Ads

दि.०५ जुलै : वाशिम जिल्ह्यात ४ रुग्णांची भर : एकुण संख्या पोहोचली १०९ वर Janta Parishad Washim


दि.०५ जुलै : वाशिम जिल्ह्यात ४ रुग्णांची भर 

एकुण संख्या पोहोचली १०९ वर 

वाशिम (जनता परिषद) दि.५ - काल रात्री उशीरा प्राप्त कोरोना चाचणीचे संदर्भातील अहवालांनुसार जिल्ह्यातील ४ जण कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांत मालेगांव तालुक्यातील २, मंगरुळपीर १ तर रिसोड तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकंदर आजपर्यंतचे प्राप्त कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही १०९ वर पोहोचली आहे. 
या चार जणांमध्ये आयएलआय ची लक्षणे असलेले मालेगांव येथील २६ व ३४ वर्षीय पुरुष, नागपूर येथे कोरोना बाधीत आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील मंगरुळपीर येथील २९वर्षीय पुरुष आणि औरंगाबाद येथून हराळ ता.रिसोड येथे परतलेल्या एका २५ वर्षीय युवकाचा समावेश आहे. 

काल दि.०४ जुलै रोजी सायंकाळी प्राप्त माहितीमध्ये, सनगांव ता.मंगरुळपीर येथील एक महिला पुणे येथे कोरोना बाधीत आढळून आली होती. तर मुंबई येथे उपचार घेत असलेल्या तोंडगांव येथील महिलेला डिस्जार्च देण्यात आला होता. तर कालच हकीम अली नगर, वाशिम एक व्यक्ती काल अकोला येथे कोरोना बाधित आढळून आला आहे. 
     वाशिम शहरातील एका व्यक्तीला आज वाशिम कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे...

जिल्ह्यातील एकुण १०९ तसेच जिल्हाबाहेर उपचार सुरु असलेल्या किंवा घेतलेल्या परंतू वाशिम जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या १४ वक्तींना धरुन कोरोनाग्रस्त जिल्हावासीयांची संख्या ही १२३ झाली आहे. तर यांतील १ व्यक्तीचा (मुंबई येथून परतलेल्या मालेगांव येथील व्यक्ती) वाशिम जिल्ह्यातच तर २ व्यक्तींचा (कवठळ येथील व्यक्ती वर्धा येथे तर कारंजा येथील महिला अकोला येथे) असे ३ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. 

No comments

Powered by Blogger.