Header Ads

जे.एस. पब्लिक स्कूल मधे वसंतराव नाईक जयंती साजरी : वसंतराव नाईक यांचे गुण अंगी कारावे - अरुण राठोड

जे.एस. पब्लिक स्कूल मधे वसंतराव नाईक जयंती साजरी

वसंतराव नाईक यांचे गुण अंगी कारावे - अरुण राठोड

     मानोरा (ता प्र:) दि.०१ - श्री सेवालाल बहुद्देशिय संस्था नाईक नगर मानोरा द्वारा संचालित जे एस पब्लिक स्कूल मधे वसंतराव नाईक यांची जयंती कृषि-दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख संस्थेचे अध्यक्ष तथा आदर्श तलाठी अरुण राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून मानोरा येथील मंडळ अधिकारी सुभाष जाधव व संस्थेचे सचिव प्रा अनिल चव्हाण हे होते. सर्व प्रथम वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विदर्भ पटवारी संघटना नागपूर उप विभाग कारंजा मानोरा चे सचिव तलाठी एस. एस. राठोड यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
     यावेळी मुख्याध्यापिका स्वरुपा चव्हाण,  कु रक्षा राऊत, मनोहर राठोड, इंगोले, नवघरे इत्यादि उपस्थित होते. कार्यक्रमाला तलाठी, मंडळ अधिकारी तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्वरूपा चव्हाण यांनी तर आभार कू रक्षा राऊत यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.