Header Ads

उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आदेशान्वये कारंजा तालुक्यातील रामनगर (पिंप्री फॉरेस्ट) गांव सिल

उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांचे आदेशान्वये कारंजा तालुक्यातील रामनगर (पिंप्री फॉरेस्ट) गांव सिल 

काल आढळून आला होता एक कोरोना बाधीत रुग्ण 

कारंजा (जनता परिषद) दि.१३ - एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे आढळून आल्याने त्याचा संसर्ग जास्त होऊ नये व कोरोना ह्या विषाणूला प्रतिबंध करता यावा, या हेतूने कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या आदेशान्वये कारंजा तालुक्यातील ग्राम रामनगर (पिंप्री फॉरेस्ट) ह्या गांवच्या सिमा सिल करण्यात आल्या आहेत. ह्या कंटोन्मेंट झोन चे बाहेर पडण्यावर व आतमध्ये जाण्यावर मनाई हुकुम जारी करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ चे कलम १४४ नुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधीत पोलिस स्टेशन अधिकारी व गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना देण्यात आलेले आहेत. सदर आदेश हे आदेश जारी केल्याचे म्हणजेच १२ जुलै २०२० पासून तर पुढील १४ दिवसापर्यंत लागू राहणार आहेत. त्याअनुषंगाने पोलिस प्रशासन व प्रशासनाने रामनगर च्या चतु:सिमा सिल केल्या आहेत. 
काल दिनांक १२ जुलै रोजी तालुक्यातील रामनगर येथील एक व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निदान झाले होते. सदरहू व्यक्ती ही यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना बाधीताचे संपर्कातील आहे. यापुर्वी कारंजा तालुक्यात दादगांव, सुकळी,  शेमलाई येथे रुग्ण आढळून आले होते; मात्र ते बरे झाल्याने ग्रामीण भाग हा कोरोनामुक्त झाला होता. मात्र आता चार दिवसांपुर्वी कामरगांव व त्यानंतर रामनगगर येथे पुन्हा ग्रामीण भागात ह्या रोगाने शिरकाव केले आहे. 
कोरोनाची संसर्गाची लक्षणे - कोरडा खोकला, ताप, श्‍वास घेण्यास त्रास, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, कफ हे असून असे लक्षणे आढळून आल्यास आपले नांव, संपूर्ण पत्ता आदी माहिती ८३७९९ २९४१५या क्रमांकावर व्हाटस्‌अप मॅसेज द्वारे त्वरीत पाठवावी. 
     हा रोग पुर्णपणे बरा होणार असून, त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नागरिकांनी मास्क लावणे, सुरक्षीत अंतर राखणे सह प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करणे गरजेचे आहे. 

1 comment:

  1. कारंजशहर नगरपरिषदेन सोडियम हायपोक्सँलोराईट व डिडीटी ने सँनिटाईज करणे गरजेच आहे.रिद्धी-सिद्धी काँलनीमधे पक्कारोड ड्रेनेज करने गरजेच आहे़.शहरात रोडच्या बाजुने वृक्षारोपन करने महत्वाचे आहे.

    ReplyDelete

Powered by Blogger.