Header Ads

washim corona news : दि.२६ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज १३ व्यक्ती पॉझिटिव्ह

washim corona news update korona washim karanja manora risod malegaon

दि.२६ जुलै : वाशिम जिल्ह्यात आज १३ व्यक्ती पॉझिटिव्ह 

एकुण संख्या झाली ५३१; आज १५ व्यक्ती डिस्जार्च 

वाशिम (जनता परिषद) दि.२६ - आज रोजी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरातून १३ व्यक्ती ह्या कोरोनाबाधीत आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधीतांची संख्या ही ५३१ झाली असून आज एकुण १५ व्यक्तींना बरे झाल्याने डिस्जार्च देण्यात आला. 

आज दुपारी १२.३० वाजताचे वृत्तानुसार, ४ व्यक्ती बाधीत 

आज दुपारी ८६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ८२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आहेत. ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह असून यामध्ये वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील १, गिरोली (ता. मानोरा) येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १ व नांदगाव येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

संध्याकाळी ६.३० वाजताचे वृत्तानुसार, ९ व्यक्ती बाधीत 

       आज रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव येथील शिंदे कॉलनी परिसरातील १,  आसेगाव येथील १, मांगवाडी (ता. रिसोड) येथील १, वाशिम शहरातील सोफिया नगर येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसरातील ३ व शिंदे नगर परिसरातील २ अशा एकूण ९ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज १५ व्यक्तींना डिस्चार्ज

     वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, रिसोड शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील ३, गजानन नगर परिसरातील ३, मांगवाडी येथील १, वनोजा (ता. रिसोड) येथील १, पांगरी कुटे (ता. मालेगाव) येथील १, कारंजा लाड शहरातील आदर्श कॉलनी १, सहारा कॉलनी १, इंदिरा नगर  १, शिक्षक कॉलनी १, पोलीस कॉलनी परिसरातील १ व्यक्तीला आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह - ५३१ ऍक्टिव्ह - २२७ 
         डिस्चार्ज  - २९५          मृत्यू - ९
(टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.