Header Ads

वाशिम जिल्ह्यातील गरजू बेरोजगार उमेदवारांनी करावी ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी

mahaswayam, janta parishad

वाशिम जिल्ह्यातील गरजू बेरोजगार उमेदवारांनी करावी 

 ‘महास्वयंम’ संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी 

खाजगी आस्थापनाही नोंदवू शकतात मनुष्यबळाची मागणी

     वाशिम, दि. ०५ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गामुळे औद्योगिक आस्थापनावर असलेले मजूर स्वतःच्या गावी परतल्याने औद्योगिक आस्थापनांमध्ये मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी तातडीने ‘महास्वयंम’ अर्थात www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
     मोबाईलवरून सुद्धा ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. याकरिता उमेदवारांनी प्ले स्टोअरमध्ये जावून ‘महास्वयंम’ नावाचे ‘टेक टीम एमएसएसडीएस’ने विकसित केलेले अॅप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. नाव नोंदणी तसेच नोंदणी अद्ययावत करण्याची सुविधा या अॅपवर उपलब्ध आहे. ही सुविधा पूर्णतः निःशुल्क आहे.
खाजगी आस्थापनाही नोंदवू शकतात मनुष्यबळाची मागणी
     खाजगी, औद्योगिक तथा शासकीय आस्थापनांना कुशल व अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळाची मागणी नोंदविण्याची मोफत सुविधा सुद्धा ‘महास्वयंम’ संकेतस्थळ व मोबाईल अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार, मनुष्यबळाची आवश्यकता असणाऱ्या आस्थापना यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.