कारंजा शहर हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली ९ तर तालूक्याची १४
अफवा पसरवू नका | मास्क वापरा ॥ मुक्तसंचार करु नका ॥
कारंजा शहर हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली ९ तर तालूक्याची १४
दादगांव येथील महिला झाली बरी; आज झाला डिस्जार्च
नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाचे सुचनांचे पालन करावे
कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.कुरवाडे यांचे जनतेला आवाहन
कारंजा (जनता परिषद) दि.१४ - आज गांधी चौकातील त्या व्यक्तीचे संपर्कातील ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अमरावती येथे संबंधीत व्यक्ती व त्यांचे पत्नीचा कोरोना विषयक चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. यामुळे कारंजा शहर हद्दीतील एकुण कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या ही आजरोजी ९ वर पोहोचली आहे. तर तालुक्यातील दादगांव (१), शेमलाई (१), सुकळी(३) येथील ५ व्यक्ती असे एकुण १४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असून यांतील १३ हे ऍक्टीव रुग्ण आहेत. दादगांव येथील महिला बरी झाल्यामुळे त्यांना डिस्जार्च देण्यात आलेला आहे.
स्थानीक गांधी चौक परिसरातील एक ६५ वर्षीय गृहस्थ व त्यांच्या पत्नी हे अमरावती येथे झालेले कोरोना विषयक चाचणीत पॉझिटिव्ह आले होते. त्यांचे परिवारातील एकुण ६ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आज रोजी त्यांचे परिवारातील २३ जणांचे स्वॅबचे नमुने घेण्यात येणार असून त्यांचा रिपोर्ट हा उद्या येईल अशी माहिती कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिली आहे.
दि. ११ जुन रोजी स्थानीक शिवाय नम: मठाजवळील गृहस्थ हे पॉझिटिव्ह आल्यानंतर कालच आलेल्या रिपार्ट मध्ये त्यांची पत्नी व मुलगीही कोरोना बाधीत आली होते. त्यांचे संपर्कातील इतर काही व्यक्तींचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले होते.
नागरिकांनी काळजी घ्यावी व प्रशासनाचे सुचनांचे पालन करावे
कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.कुरवाडे यांचे जनतेला आवाहन
यामुळे आता कारंजा शहर हद्दीतील निवासी असलेले एकुण ९ जण असून तालुक्याची कोरोना रुग्णांची संख्या ही १४ वर पोहोचली अहे. शहरवासीयांनी कोरोनाचा संसर्ग जास्त होऊ नये व आपल्याला त्याची लागण होऊ नये, यासाठी सर्वच सुचनांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. सर्वच नागरिकांनी मास्क वापरावे, विनाकारण बाहेर फिरु नये, गर्दी टाळावी, सोशियल डिस्टेंसींगचे पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन कारंजा नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी केले आहे.
Post a Comment