Header Ads

पंतप्रधानांची घोषणा : नोव्हेंबर पर्यंत देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य

पंतप्रधानांची घोषणा : नोव्हेंबर पर्यंत देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य 

कोरोना काळात पंतप्रधानांनी देशाला सहाव्यांदा केले संबोधीतगांव प्रमुख असो कि देश प्रमुख नियमांच्या वर कोणीही नाही पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळी पर्यंत चालणार 

नवी दिल्ली दि.३० - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी देशाला संबोधीत केले. देशात कोणत्याही गांवचा प्रमुख असो कि देशाचा प्रमुख नियमांच्या वर कोणीच नाही, कोरोनाच्या या युगात सर्वांनी नियमांचे पालन केलेच पाहीजे असे आवाहन त्यांनी केले. आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश करीत आहोत. तसेच आता थंडीचे दिवस ही सुरु होताहेत, यामुळे सर्वांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूमध्ये जगातील देशांपेक्षा भारत हे चांगल्या स्थितीत आहे व हे लॉकडाऊनमुळेच शक्य झालेले आहे, असेही ते म्हणाले. 
वारंवार हात धुणे, मास्क वापरणे, समाजीक अंतर राखणे ह्यांचा अवलंब करुन आपण लॉकडाऊन मध्ये सावध राहीलो, मात्र आता त्यात निष्काळजीपणा दिसून येतो आहे. आपण सावध राहणे गरजेचे आहे. एका देशात पंतप्रधानाने मास्क घातले नाही म्हणून १३ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. भारतातही गावाचा प्रधान असो कि देशाचा नियम हे सर्वांसाठी सारखे आहेत व त्याचे पालन केले जाणे गरजेचे आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत गरीबांना १.७५ लाख कोटी रुपयंाचे पॅकेज देण्यात आले. मागील ३ महिन्यात २० कोटी गरीब परिवारांच्या जनधन खात्यांमध्ये सरळ ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच ९ कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या किसान कार्ड खात्यात १८ हजार कोटी पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आलेली आहे. 

नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल

आतापावेतो कोरोनाच्या लढ्यात सरकारने ८० कोटी जनतेला ३ महिन्याचे राशन म्हणजेच प्रत्येक सदस्यासाठी महिन्याचे ५ किलो गहू किंवा तांदुळ मोफत दिले आहे. पावसाळ्यात देशात जास्तीत जास्त कामे ही शेतीशी निगडीतच होतात. अनेको क्षेत्रांमध्ये मंदी आहे. हळूहळू जुलै पासून विविध उत्सवांचे वातावरण हे तयार होऊ लागते अशावेळी गरजा वाढतात, खर्चही वाढतो. याबाबी लक्ष्यात घेऊन सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा विस्तार केला असून या अंतर्गत आता दिवाळी आणि छठ पुजा म्हणजेच नोव्हेंबर पर्यंत ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिले जाईल. ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न देणारी ही योजना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर मध्येही लागू राहील. यावर मागील ३ महिन्यांचा खर्चही जोडला तर हा जवळपास दिड लाख कोटी रुपये इतका खर्च होतो आहे. 

संपूर्ण भारतासाठी एक रेशन कार्ड 

     संपूर्ण भारतासाठी रेशनकार्डची व्यवस्था केली जात आहे. एकराष्ट्र- एक रेशनकार्ड, याचा सर्वाधीक फायदा त्या गरीब सहकार्‍यानंा होणार जे आपले गांव सोडून नोकरीसाठी किंवा इतर गरजांसाठी इतरत्र जातात. आज सरकार जे काही गरीब व गरजूंना मोफत अन्न धान्य देत आहे ते शक्य झाले आहे केवळ दोन वर्गांमुळे पहिला देशातील कष्टकरी शेतकरी व दुसरा देशातील प्रामाणिक करदाता
पंतप्रधानांनी देशाला कोरोनाचे काळात आज सहाव्यादा संबोधीत केले. 
१) १९ मार्च - जनता कर्फ्यू जाहीर
२) २४ मार्च - २१ दिवस लॉकडाउन जाहीर
३) ०३ एप्रिल - दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन
४) १४ एप्रिल - लॉकडाउन-२ ची घोषणा
५) १२ मे - लॉकडाउन ४ ची घोषणा 

No comments

Powered by Blogger.