Header Ads

देशाचे राजधानीत डिजल ने रचला इतिहास; झाले पेट्रोल पेक्षा महाग :सलग १८ वे दिवशी दरात वाढ

 देशाचे राजधानीत डिजल ने रचला इतिहास; झाले पेट्रोल पेक्षा महाग 

सलग १८ वे दिवशी दरात वाढ 

मात्र देशात सर्वत्र डिजेलचे दर हे पेट्रोलपेक्षा कमीच


नवी दिल्ली दि.२४ - आज डिजेलने देशाची राजधानी नवी दिल्ली येथे  इतिहास रचला असून पहिल्यांदाच डिजेलचे दर हे पेट्रोल पेक्षा जास्त झाल्याचे दिसून आले. आज देशाची राजधानी नवी दिल्ली येथे डिजेल प्रति लिटर ७९.८८ रुपये झाले असून पेट्रोलचे दर हे ७९.७६ रुपये इतके आहे. आज बुधवारी सलग १८ व्या दिवशीही डिजेलचे किंमतीत वाढ करण्यात आली. मात्र १७ दिवसानंतर पहिल्यांदा पेट्रोलचे दरात वाढ करण्यात आली नाही. मात्र देशात सर्वत्र डिजेलचे दर हे पेट्रोलपेक्षा आजही कमीच आहेत. 


बहुतांश देशांमध्ये डिजेलचे दर हे पेट्रोल पेक्षा जास्तच

जवळपास बहुतांश देशांमध्ये डिजेलचे दर हे पेट्रोल पेक्षा जास्त असते, कारण डिजेल चे उत्पादन किंमत ही पेट्रोल पेक्षा जास्त असते. भारतात मात्र सरकारे विविध अनुदानद्वारे हे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. भारत हे खेड्यापाड्यात व ग्रामीण भागात वसलेला कृषीप्रधान देश आहे. यामुळे येथे डिजेलचे दर कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, यासाठी भारतात केंद्र व राज्य सरकारे विविध अनुदान देतात. तसे पाहिल्यास भारतात आधारभूत किंमतीनुसार पेट्रोलची किंमत प्रतिलिटर २२.११ रुपये तर डिजेलची २२.९३ रुपये इतकी आहे. 

कोरोनाचे वैश्‍विक महामारीमुळे पेट्रोल-डिजेल दरांत वाढ

आजमितीला कोरोेना या वैश्‍विक महामारीचे काळात भारतच नव्हे तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशाचे काम-धंदे हे बंद पडलेत, यामुळे अर्थव्यवस्‌थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यासाठी शासन, प्रशासन तसेच आर्थिक क्षेत्रातील दिग्गजांचे म्हणणे नुसार अर्थव्यवस्थेला मजबुती देणेसाठी ही वाढ क्रमप्राप्त झाली आहे. मात्र डिजेलचे दरवाढीमुळे एकंदर वाहतूक खर्च वाढेल ज्यामुळे महागाई वाढुन सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसणार आहे. 

No comments

Powered by Blogger.