Header Ads

मानोरानंतर वाशिम व कारंजा तालुक्यातही आढळले १-१ कोरोना रुग्ण

मानोरानंतर वाशिम व कारंजा तालुक्यातही आढळले १-१ कोरोना रुग्ण

कारंजा तालुक्यातील ग्राम दादगांव येथील तसेच वाशिम येथील पंचशिल नगरातील महिलाही कोरोना पॉझिटिव्ह


कारंजा (का.प्र.) दि.४ - कालच मानोरा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटल्यानंतर आज कारंजा व वाशिम तालुक्यात १-१ रुग्ण भेटल्याने संपुर्ण वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तिन्ही रुग्ण ह्या महिला असून सर्वच बाहेरुन वाशिम जिल्ह्यात आलेले आहेत, हे येथे विशेष. 
कारंजा तालुक्यातील ग्राम दादगांव येथे नवी दिल्ली येथून आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारंजा तालुक्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे संपूर्ण दादगांव हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर वाशिम येथील पंचशिल नगर येथे मध्यप्रदेशातून आलेल्या तरुणीचा कोरोना विषयक अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे काल रात्रीच प्रशासनाने ह्या भागाला सिल करण्याचे काम सुरु केले. 
कालच मानोरा तालुक्यातील ग्राम भोयणी येथे मुंबई येथून परतलेल्या महिलेचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुर्णपणे कोरोना मुक्त झालेल्या वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोना चे केसेसची सुरुवात झाली होती. 
सदरहू रुग्णांचे संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलनाचे काम प्रशासनाने सुरु केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
आजमितीला वाशिम जिल्ह्यात एकुण ३ ऍक्टीव्ह कोरोना रुग्ण असून आतापावेतो जिल्ह्यात परिक्षणात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही ११ झाली असून यांतील २ मृत्यू झालेत तर ६ हे बरे झाले आहेत. 

No comments

Powered by Blogger.