Header Ads

कारंजा शहरातील एक व्यक्तीची अमरावती मध्ये आली पॉझिटिव्ह रिपोर्ट



कारंजा शहरातील एक व्यक्तीची अमरावती मध्ये आली पॉझिटिव्ह रिपोर्ट 

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - आज दुपारचे सत्रात अमरावती जिल्ह्यातील आलेल्या कोरोना विषयक चाचणीचे अहवालात कारंजा येथील गांधी चौक परिसरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 
कालच रेस्ट हाऊस परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर ही शहरातील दुसरी पॉझिटिव्ह केस असून शहरातील नागरिकांत यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
प्रशासन यावेळी हरकतीत आले असून उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसिलदार धिरज मांजरे व ठाणेदार सतीश पाटील यांनी या भागाला भेट दिली असून या रुग्णाचे संपर्क पाहून त्यांचा मागोवा घेतला जाणार आहे. तसेेच किती व कोणता भाग कोंंटेेंंन्मेंंट करावा हे पाहीलेे जात आहे.
तसेच नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.