Header Ads

१२ जुन : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी १५ पॉझिटिव्ह

१२ जुन : वाशिम जिल्ह्यात संध्याकाळी १५ पॉझिटिव्ह

तालुकानिहाय वाशिम - १०; मालेगांव - ३;  रिसोड - २

आजची संख्या : १५+१=१६; ऍक्टीव्ह - ३४ तर एकुण - ४२

अचानकच इतके रुग्ण वाढल्याने जनतेसह प्रशासनही हादरले 

कारंजा (जनता परिषद) दि.१२ - वाशिम जिल्ह्यात आज संध्याकाळी प्राप्त अहवालानुसार, १५ व्यक्तींचे कोरोना विषयक चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सकाळचे सत्रातील १ रुग्ण असे आजची रुग्ण संख्या ही १६ झाली आहे. अचानकच इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाचीही झोप उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संध्याकाळी प्राप्त या अहवालातील १५ जणांमध्ये १० निमजगा ता.वाशिम, ४ मालेगांव तालुका व १ रिसोड तालुक्यातील असल्याचे कळते.

वाशिम तालुक्यातील निमजगा येथील १० पॉझिटिव्ह 

वाशिम तालुक्यातील निमजगा येथील १० व्यक्ती ह्या बोराळा येथील रुग्णाचे संपर्कातील असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. यांत २८, ४५ व ३५ वर्षीय महिला, १३ व १६ वर्षीय युवती, २० वर्षीय युवक, १० व ४ वर्षीय मली व १० व ६ वर्षीय मुलाचा सहभाग आहे.

मालेगांव तालुक्यात ३+१ असे ४ पॉझिटिव्ह 

मालेगांव तालुक्यात ३ रुग्ण आढळून आले असून सकाळी १ रुग्ण आढळून आला होता. यांत ग्राम खेर्डा येथे मुंबई येथून आलेली एक ३१ वर्षीय महिला तर भेरा येथील पती-पत्नी २८ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय महिला हे दोघे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

रिसोड शहरात १ तर तालुक्यातील कन्हेरी येथे १ रुग्ण 

रिसोड तालुक्यातही आता कोरोनाने शिरकाव केला असून पहिल्यांदाच शहरातील एकता नगर येथे दिल्ली येथून आलेल्या एका ४१ वर्षीय पुरुष व तालुक्यातील ग्राम कन्हेरी येथील मुंबई येथून आलेली ६० वर्षीय महिला ही पॉझिटिव्ह आले आहेत.


No comments

Powered by Blogger.