Header Ads

भाजप वचनपूर्ती अभियानासाठी मानोरा पंचायत समिती सभापतींचा गावोगावी दौरा


भाजप वचनपूर्ती अभियानासाठी मानोरा पंचायत समिती सभापतींचा गावोगावी दौरा
आ. राजेंद्र पाटणींच्या नेतृत्वात तालुक्यात अभियान प्रारंभ


     मानोरा (जनता परिषद) दि. 21 - हिंदुस्थान हे जगातील सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र असून सार्वत्रिक निवडणुकीच्या पद्धतीने येथे केंद्र आणि राज्यामध्ये लोकाभिमुख सरकारे स्थापन होत असतात.
   भारत वर्षांमध्ये तब्बल पाच दशकांपर्यंत काँग्रेस पक्षाकडे राजसत्तेची धूरा असूनही देशाचा समग्र विकास ह्या पक्षाचे सरकार करू न शकल्यामुळे सन 2014 आणि 2019 मध्ये देशातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र दामोदरदास मोदी या सगळ्यांना सोबत घेऊन देशाचा विकास करणाऱ्या नेत्याच्या हाती लोकशाही पद्धतीने भारत वर्षाची सत्ता दिलेली आहे.
   भारतीय राजकीय इतिहासामध्ये हे बिगर काँग्रेसी असणारे आणि सलग दुसऱ्यांदा जनतेच्या विकासा साठी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात संपूर्ण बहुमताने प्रवेश करणारे मोदींच्या नेतृत्वातील हे पहिलेच सरकार अस्तित्वात आले आहे. देशात सगळ्यात मोठ्या संख्येत असणारा शेतकरी असो अथवा महिला यांचा सर्वांगीण विकास व्हावा. गरिबांना कुठल्याही आडपडदा न राहता त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत यासाठी जनधन योजनेचा प्रारंभ, प्रत्येक गरीब असो अथवा मागासवर्गीय कुठल्याही महिलेच्या डोळ्यातून अश्रू येऊ नये यासाठी म्हणून उज्वला ह्या देशव्यापी गॅस जोडणी योजनेचा शुभारंभ, किसान सन्मान योजनेचा प्रारंभ, उद्योग,सिंचन, युवकांसाठी कौशल्य विकासाची पायाभरणी मोदी सरकार कडून देशभरात करण्यात आली.
  मोदी सरकार कडून पहिल्या कार्यकाळात देण्यात आलेल्या वचनांची पूर्ती 2019 नंतरच्या दुसऱ्या कार्यकाळात वेगाने होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या या वचनपूर्ती अभियानाचा शुभारंभ कारंजा-मानोरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सगळ्या गावांमध्ये करण्यात येत आहे.
 मानोरा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ.सागर प्रकाश जाधव ह्या मागील दोन दिवसांपासून तालुक्यामधील अनेक गावांना वचनपूर्ती अभियानानिमित्त भेटी देत आहेत.
  वचनपूर्ती अभियानानिमित्त तालुक्‍यातील गावोगावी भेटी देत असतानाच कोरोना ह्या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वतःचे,आपल्या कुटुंबियांचे, मित्र परिवाराची काळजी घेण्याचे आवाहनही सौ. सागर प्रकाश जाधव नागरिकांना करीत आहेत.

No comments

Powered by Blogger.