Header Ads

महाराष्ट्रातील पदवीचे अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी : प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल दोन्ही प्रकारच्या परिक्षा रद्द

महाराष्ट्रातील पदवीचे अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

अंतीम वर्षाची प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल दोन्ही प्रकारच्या परिक्षा रद्द 

मुंबई (जनता परिषद) दि.२६ - राज्यातील अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामध्ये Professional  -व्यवसायीक तसेच Non Professaional  - गैर व्यवसायिक अभ्यासक्रमाचे सर्वच विद्यार्थ्याच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे नियमानुसार अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. 
मात्र ह्या निर्णयाला शिखर संस्थांची मंजूरात मिळणे अद्याप बाकी आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान  यांना पत्र लिहून शिखर संस्थांना तसेच निर्देश देऊन यासाठी मान्यता देण्याची मागणी केली आहे. 
देशात विशेषत: महाराष्ट्रात कोराना व्हारसचा वाढता संसर्ग व धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांसाठी घेतला आहे. विशेेष म्हणजे दहावी व बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात येऊन उर्वरित परिक्षा ही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज अंतीम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्वीट करुन ही माहिती देण्यात आलेली आहे. 

No comments

Powered by Blogger.