Header Ads

३० जुननंतर लॉकडाऊन उठणार नाही; काही बाबींमध्ये शिथीलता मिळेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद

३० जुननंतर लॉकडाऊन उठणार नाही 

 काही बाबींमध्ये शिथीलता मिळेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला जनतेशी संवाद  

मुंबई दि.२८ - कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही, त्यामुळे ३० नंतर लॉकडाऊन संपणार नाही; काही बाबीमध्ये शिथीलता देण्यात येईल असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना केले. १ जुलै पासून काही बाबींमध्ये शिथीलता देण्यात येईल म्हणजे सर्वकाही ऑलवेल झाले असे नागरिकांनी समजू नये, गर्दी केल्यास व कोरोनाचा संसर्ग वाढल्यास पुन्हा अत्यंत कडक लॉकडाऊन लावले जाऊ शकते असेही ते म्हणाले.
३० जुन रोजी लॉकडाऊन संपणार आहे. मात्र अर्थचक्र गतीमान करणेसाठी हळुहळु सर्वच गोष्टी पुर्वपदावर येणेचे दृष्टीने कार्य होणे गरजेचे आहे. मात्र तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी, अनावश्यक घराबाहेर पडून गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन 

कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात, यामुळे त्याचा प्लाझ्मा वापरल्यास कोरोना रुग्ण हा बरा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर बळावते. म्हणून रक्तदान प्रमाणेच प्लाझ्मा दान करा, असे आवाहनही मुख्यमंत्री यांनी केले.
अनलॉकमुळे प्रवास करणार्‍यांची संख्या वाढली. व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेलीत यामुळे कोरोेनाचा संसर्ग वाढल्याची कबुलीही त्यांनी दिली. 

बोगस बियाणे विकणार्‍यांवर कडक कारवाई करणार 

बोगस बियाणे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांना अजीबात सोडले जाणार नाही, गुन्हे दाखल केले जातील असेही ते म्हणाले. त्यांच्याकडून नुकसानीची भरपाई देखील करवून घेण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना लुबाडणार्‍यांना अजीबात माफ केले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. 

No comments

Powered by Blogger.