Header Ads

मालेगांव करांसाठी आनंदाची बातमी

मालेगांव करांसाठी आनंदाची बातमी 

४८ वर्षीय व्यक्तीची कोरोनावर मात

मालेगांव (प्रतिनिधी) दि. २१ -  दादर (मुंबई) येथून आलेल्या मालेगाव येथील ४८ वर्षीय व्यक्तीने  कोरोनावर मात दिली असुन त्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे. 
            विशेष म्हणजे मुंबई येथुन आल्यावर  कोणतीही लक्षणे नसतांना सुद्धा फक्त  रेड झोनमधुन आल्यामुळे  एक जबाबदार नागरिक या नात्याने त्यांनी स्वतः होऊन ग्रामिण रुग्णालयात जाऊन अवगत केले व आरोग्य विभागाच्या सल्ल्यानुसार कोविड चाचणी करुन घेतली. तसेच मुंबईहुन आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाने चाचणी होईपर्यंत घरातील इतर सदस्यांपासुन स्वतःला वेगळ्या रुममध्ये आयसोलेट करुन ठेवले. ज्यामुळे आजाराची श्रुंखला तेथेच थांबली. रुग्नाच्या कुटूंबाची दोन वेळा व घरातील इतर सदस्यांची कोविड चाचणी निगेटीव्ह आली. अशी आदर्श  कार्यपद्धती आज प्रत्येकाने अवलंबने गरजेचे आहे. 
         त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार करोना या आजारबाबत जनमाणसात अधिक प्रमाणात जागरुकता येणे गरजेचे आहे. हा एक सामान्य व्हायरल आजार असुन उपचाराने बरा सुद्धा होत आहे. फक्त वयस्कर व इतर आजाराने ग्रस्त रुग्णांना मात्र याचा थोडा धोका उद्भवतो. त्यामुळे  मनात कोणतीही भिती न बाळगता काही लक्षणे जाणविल्यास मनात कोणताही किंतुपरंतु न ठेवता आपली  तपासणी करुन घ्यावी. ज्यामुळे त्यांचे स्वतःचे  कुटूंब व गावातील नागरिक सुरक्षित राहतील.

No comments

Powered by Blogger.