जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण
वाशिम येथे महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणे साजरा
जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण
वाशिम, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आज, १ मे रोजी वाशिम येथे अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव, अधीक्षक तथा तहसीलदार प्रशांत जाधव यांची उपस्थिती होती.
सध्या कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीचा महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयीच ध्वजारोहण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला.
Post a Comment