तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन
परराज्यात अडकलेले ज्यांना परत यावयाचे आहे त्यांची माहिती द्यावी
तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन
कारंजा (जनता परिषद) दि.३० - कोरोना ह्या रोगाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे सर्वच राज्य काय तर जिल्ह्यांच्या सिमा ह्या सिल केल्या गेल्या आहेत. यामुळे जो व्यक्ती जेथे आहे तेथेच अडकून पडला आहे. यावर उपाय म्हणनू राज्य व केंद्र शासनाचे निर्देशानुसार दुसर्या राज्यात अडकलेल्या विद्यार्थी, मजूर, पर्यटक यांना परत आणणे बाबत कार्य सुरु झाले आहे.
त्या अनुषंगाने कारंजा तालुक्यातील अशी परराज्यात अडकलेली व्यक्ती ज्यांना परत यावयाचे आहे, त्यांनी त्या व्यक्तींची नावे, मोबाईल नंबर, जेथे आहेत त्या जिल्ह्याचे नांव, ठिकाण, राज्याचे नांव या विस्तृतत स्वरुपात तहसिल कार्यालय, कारंजा येथे सादर करावेत असे आवाहन कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. या संदर्भात खेडे विभागात राहणार्यांनी तलाठी यांचेकडे याबाबत माहिती द्यावी असेही त्यांनी सांगितले आहे.
Post a Comment