Header Ads

https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर माहिती देणे गरजेेचे

जिल्ह्यातून इतरत्र जाणेसाठी किंवा इतर ठिकाणाहून जिल्ह्यात येणेसाठी 

वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे नागरिकांना आवाहन 

https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर माहिती देणे गरजेेचे 


   वाशिम (जनता परिषद) दि.०२ - वाशिम जिल्ह्यातून महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच इतर जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात येण्यासाठी मजूर/कामगार/पर्यटक/भाविक/विद्यार्थी व इतर व्यक्तींनी कोणते माध्यमातून जावे व काय करावे यासंदर्भात वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वतीने संकेतस्थळ देण्यात आले असून यांत नेमकी कशा प्रकारे माहिती संबंधीतांनी भरावी जेणेकरुन त्यांचे गंतव्य सोपे होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. 
यासांी खालील संकेतस्थळावर संबंधीतांनी माहिती भरणे अनिवार्य आहे.
या संकेतस्थळावर माहिती भरतांना खालील मुद्यांची माहिती देणे गरजेचे राहणार आहे. 
१) या संकेतस्थळावर माहिती भरताना सुरुवातीला जिल्हा/पोलीस आयुक्तालय याठिकाणी तुम्ही सध्या ज्या जिल्ह्यात/पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आहात तो जिल्हा/शहर निवडा व नंतरच माहिती भरण्यास सुरुवात करा.
२) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरताना फोटो, आधारकार्ड अथवा फोटो असलेले ओळखपत्र तसेच कोविड-१९ विषयक लक्षणे नसल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणारा टोकन क्रमांक जतन करून ठेवा.
३) तुम्ही जेथे आहात तेथील जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर तुम्हाला याच संकेतस्थळावर  ई-पास उपलब्ध होईल. अर्ज भरल्यानंतर मिळालेला टोकन क्रमांक टाकल्यानंतर आपणास ई-पास उपलब्ध होईल. प्रवासामध्ये हा ई-पास सोबत ठेवणे आवश्यक आहे. ई-पास शिवाय कुणालाही वाशिम जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे आपण उपरोक्त संकेतस्थळावर आपली माहिती भरुन ई-पास प्राप्त करून घ्यावा, ही विनंती. 
यावेळी विशेष महत्वाची सूचना अशी की, जिल्हा प्रशासनामार्फत यापूर्वी देण्यात आलेल्या लिंकवर माहिती भरली असली तरीही https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर माहिती भरणे आवश्यक आहे. त्याशिवाय ई-पास उपलब्ध होणार नाही.
काही अडचण असल्यास नागरिकांनी अधिक माहीतीकरीता ०७२५२-२३४२३८ या दुरध्वनीवर किंवा ८३७९९२९४१५ या मोबाईल क्रमांकावर सपर्ंक साधा असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.  




No comments

Powered by Blogger.