Header Ads

पोलिस दलातील तिघांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह

वाशिम जिल्हा पोलिस दलातील तिघांना पोलिस महासंचालकांचे सन्मान चिन्ह 

एक ASI अधिकारीसह दोन महिला कर्मचारी सन्मानीत


     वाशिम (जनता परिषद) दि. ०२ - वाशिम जिल्ह्यातील एका सह पोलिस उपनिरीक्षकासह दोन महिला पोलिस कर्मचार्‍यांना विशेष कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. ASI शंकर सोळंके, भागूबाई बल्लाड (महिला पोलिस कॉन्स्टेंबल/१९८८) व रेखा लांडकर (महिला पोलिस कॉन्स्टेंबल-/१२८४) ह्या तिघांना हा सन्मान देण्यात येणार आहे. ३० एप्रील रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक सु.कु.जायसवाल यांचे आदेशान्वये राज्यातील ह्या सन्मानास पात्र विविध पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 
महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तसेच उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक व पोलिस शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. त्या अनुषंगाने हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र हे वर्ष २०१९ या वर्षाकरीता देण्यात आलेले आहे. 
वाशिम जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचार्‍यांना देण्यात येणार्‍या या सन्मानामुळे पोलिस प्रशासनाचे मनोबल वाढणार आहे, हे निश्‍चित. 

No comments

Powered by Blogger.