Header Ads

आज ट्रक चालकाचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर इतर ११ निगेटिव्ह

नेर येथील शिक्षकाचे संपर्कातील कारंजातील डॉक्टर, ७ सहकारी व रुग्णाचे परिवारातील ४ सदस्यांसह १३ जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने उद्या शनीवारी तपासणीसाठी पाठविणार

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांची माहिती

आज ट्रक चालकाचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह तर इतर ११ निगेटिव्ह 



वाशिम (जनता परिषद) दि.०८ - यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील शिक्षक रुग्णाची तपासणी करणार्‍या कारंजा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर व त्यांचे समवेतील ७ असे ८ जणांचे व त्या शिक्षकाचे परिवारातील ४ सदस्यांसह  एकुण १३ जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने हे उद्या म्हणजेच शनीवार दि.०९ मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यांचा निकाल रविवार रोजी येण्याची शक्यता आहे अशी माहिती वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांनी जनता परिषदला दिली. 
४ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील एका शिक्षकाचे चेकअप कारंजातील सुप्रसिद्ध डॉक्टर यांनी केले होते. तो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ६ मे रोजीचे यवतमाळ येथे निष्पन्न झाले होते. त्यामुळे ६ मे रोजीच त्या रुग्णावर उपचार करणारे व त्यांचे संपर्कातील इतर ७ असे ८ जणांना वाशिम येथे नेण्यात आले होते. तसेच या शिक्षक  रुग्णाचे नातेसंबंधातील ४ लोकांना वाशिम येथे नेण्यात आले होते.
कोरोना रुग्णाचे संपर्कात आल्या नंतर संपर्कातील व्यक्तीचे स्वॅबचे नुमने हे ५-६ दिवसांनी तपासणी साठी पाठविले जाते. नेर येेथील त्या शिक्षकाचा उपचार कारंजा येथे ४ मे रोजी करण्यात आला होता. त्यानुसार उद्या शनीवार दि. ९ मे रोजी सहावा दिवस असून डॉक्टरांचे सह ७, शिक्षकाचे परिवारातील काही सदस्य असे एकूण १३ जणांचे घशांचे स्त्रावाचे नमुने हे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येतील.

ट्रक ड्रायव्हरचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह : इतर ११ जणांचे निगेटिव्ह

२ मे रोजी मृत झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह क्लिनरचे संपर्कातील ट्रकचा ड्रायव्हर, पेट्रोल पंप वरील ५ जण,  इतर ४ असे एकूण ९ जणांचे व सारा ह्या रोगाचे ३ असे एकुण १२ जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी काल दिनांक ०७ मे रोजी पाठविण्यात आले होते. त्यातील ११ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले असून ट्रक ड्रायव्हरचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मा.श्री.हृषीकेश मोडक यांनी दिली आहे. 

No comments

Powered by Blogger.