Header Ads

अकोल्यातील ती व्यक्ती कारंजात १५ मार्च पासून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती

अफवा पसरवू नका, अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे

अकोल्यातील ती व्यक्ती कारंजात १५ मार्च पासून आलेली नसल्याची प्राथमिक माहिती

नागरिकांनी खुप घाबरुन जाण्याचे काही कारण नाही

कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी दिलेली प्राथमिक माहिती



कारंजा (जनता परिषद) दि.०९ - अकोला येथे आज सायंकाळी मिळालेल्या काही पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक व्यक्ती ही कारंजाची असल्याची बातमी आली. मात्र सदरहू व्यक्ती ही अकोला येथेच शिक्षक असून प्राप्त प्राथमिक माहिती नुसार ती व्यक्ती १५ मार्च नंतर कारंजात आलेली नाही त्यामुळे कारंजेकरांनी ह्यामुळे खुप जास्त घाबरुन जाण्याचे कारण नाही अशी माहिती कारंजाचे तहसीलदार धिरज मांजरे यांनी दिली आहे. 
ह्या संदर्भात त्या इसमाचे कारंजातील नातेवाईक व संबंधीतांसह बाहेरुनही माहिती घेण्यात आली असून ते लॉकडाऊन पुर्वी पासून ती व्यक्ती कारंजात आली नसल्याची माहिती असून आणखीन सखोल तपास प्रशासन करीत आहे.  तरी कारंजातील नागरिकांनी संबंधीत व्यक्ती कारंजात आलेलाच नसल्याने खुप काही घाबरण्याचे किंवा अफवा उडविण्याचे कारण नाही. 
आज अकोला येथून सायंकाळचे वृत्तात अकोल्यात सकाळी २ व सायंकाळी ८ असे एकूण १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याची बातमी आली. यांतच एक रुग्ण हा कारंजा लाड जि.वाशिम येथील असून तो तेथून संदर्भित झालेला आहे अशी माहिती देण्यात आली होती. मात्र सदरहू व्यक्ती ही अकोला येथेच शिक्षक असून गत १५ मार्च पासून ती व्यक्ती कारंजात आलेली नाही, ही प्राथमिक माहिती आहे. 
कारंजा आजही सुरक्षीत आहे, आणि भविष्यातही सुरक्षीतच राहील. फक्त नागरिकांनी संयमाने रहावे व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अफवा पसरवू नका, अफवा पसरविणे कायद्याने गुन्हा आहे, हे लक्ष्यात ठेवा. 

No comments

Powered by Blogger.