Header Ads

वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

वाशिम जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

यंदा दुहेरी आव्हान, आवश्यक सज्जता ठेवावी
 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे


सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करावे  

 जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची सूचना 


वाशिम, दि. ११ (जिमाका) : मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज, ११ मे रोजी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आढावा सभा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकात ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना विषाणू संसर्ग व मान्सून काळात येणारी नैसर्गिक आपत्ती अशा दुहेरी आव्हानांना आगामी काळात सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी त्यादृष्टीने पूर्वतयारी करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने काम करावेअशा सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाणजिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधवसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकरजिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावारमहावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारियापाटबंधारे विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता प्रशांत बोरसे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊतजयंत देशपांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड यांच्यासह तहसीलदारमुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व  शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले कीजिल्ह्यात मान्सून कालावधीत पूर, वादळामुळे आपत्कालीन परस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहावे. सर्व तहसीलदार कार्यालयेपोलीस स्टेशन यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागलघुपाटबंधारे विभागमहावितरणच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावेत. या नियंत्रण कक्षामध्ये दूरध्वनी क्रमांकासह भ्रमणध्वनी क्रमांक व व्हाटसअप संदेशाद्वारे तक्रारी स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. नियंत्रण कक्षाला प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी पथके स्थापन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पुराने बाधित होण्याची शक्यता असलेल्या गावांमध्ये तीन महिन्याचे धान्य आगाऊ स्वरुपात उपलब्ध करून द्यावे. नगरपरिषदेने शहरातील नाले सफाई व दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे. शहरातील धोकादायक इमारतीझाडे यांच्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. घनकचऱ्यामुळे नाले तुंबणार नाहीत याची दक्षता घ्यावीअशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीचे पालन करून तसेच शारीरिक अंतर ठेवून व मास्क लावण्यासह इतर संपूर्ण खबरदारी घेवून ही कामे करावीत, असे त्यांनी यावेळी सांगितले.


सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करा : चंद्रकांत ठाकरे

ग्रामीण भागात विविध यंत्रणांचे लहान-मोठे साठवण तलाव, सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करून त्यांची सद्यस्थिती तपासावी. ऐन पावसाळ्यात तलाव, धरण फुटणे किंवा त्यांना गळती लागण्याचे प्रकार घडल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी अशा प्रकल्पांची दुरुस्ती पूर्ण करावी. ग्रामीण भागातील धोकादायक इमारती, वाळलेली झाडे याचे सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.


सर्व गावांसाठी ‘एसओपी’ : निवासी उपजिल्हाधिकारी

आगामी मान्सून काळात पूर, वादळ सारखी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर मात करण्यासाठी गाव निहाय स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी) तयार करण्यात येत आहे. त्यानुसार सर्व तहसीलदार व संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी कार्यवाही करावी. सर्व तहसीलदारांनी पोहणाऱ्या व्यक्तींची तालुकानिहाय माहिती संकलित करावी. आरोग्य विभागाने सर्व ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधी साठा उपलब्ध ठेवावा. तसेच प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रनिहाय साथरोग नियंत्रण पथक तयार ठेवावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे कार्यकारी अधिकारी शैलेश हिंगे यांनी यावेळी दिल्या.

No comments

Powered by Blogger.