साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक काशीराम उबाळे यांचा अपघातात मृत्यू

वाशिम जिल्हातील मातंग समाजाचे नेते, साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक काशीराम उबाळे यांचा अपघातात मृत्यू 


मालेगांव (जनता परिषद) दि.12 - साप्ताहिक संघर्षाची पहाटचे संपादक, वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाजाचे नेते काशीराम उबाळे रा. नंधाना ता.रिसोड यांचा दुचाकीला अपघात होऊन ते जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजताचे दरम्यान घडली. 
काशिराम उबाळे हे काही कामानिमित्त शिरपूर येथे येत होते. चांडस पांगरखेडा मार्गे शिरपूर येथे येत असतांना त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच. 37 एक्स 1178 चा शिरपूर जवळ अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला, मेंदुला आणि डोळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिस स्टेशनचे वतीने चालक रमेश मोेरे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. या अपघाताबाबत पोलिस पुढील तपास करीत आहे. 
एक पत्रकार व समाजसेवक म्हणून ओळख व कार्य असलेल्या काशीराम उबाळे यांच्या अपघाती मृत्यूची वार्ता कळताच सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...