Header Ads

कवठळ येथील रुग्णाचे संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह

कवठळ येथील रुग्णाचे संपर्कातील सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

मंगरुळ तालुक्यासह वाशिम जिल्ह्यासाठी सुखद वार्ता 

प्रशासनासह नागरिकांचेही शर्थीचे प्रयत्न : वाशिम जिल्हा ग्रिनझोनच 



वाशिम (जनता परिषद) दि.१४ - जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम कवठळ येथील वर्धा येथे भरती असलेला रुग्ण १० मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र आज त्याचे संबंधीत सर्वच लोकांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने काल कारंजा तालुकासाठी तर आज मंगरुळ तालूक्यासाठी पर्यायाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यासाठी सुखद वार्ता आली आहे. आज अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेद्वारा प्राप्त रिपोर्ट नुसार त्या रुग्णाचे संबंधीत ७ व सारीचे इतर २ रुग्ण असे नऊ रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. 
या रुग्णाचे संबंधीत वर्धा येथील सर्व रिपोर्ट, कारंजा येथील डॉक्टर व चमुचे रिपोर्ट व आज त्याचे कवठळ येथील नातलग यासर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने सुटकेचा अनूभव प्राप्त केला आहे. आजपर्यंत आरोग्य, पोलिस, प्रशासनासह ज्यांचेसाठी सर्व आटापिटा सुरु आहे ती वाशिम जिल्ह्यातील सुजान सर्वसामान्य जनता ह्या सर्वांचे सर्वकष शर्थीचे प्रयत्नांमुळे वाशिम जिल्हा अजूनही ग्रिनझोनच आहे, हे येथे मुख्य!
दरम्यान, आजपर्यंत एकुण ९७ स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यांतील ९४ रिपोर्ट हे निगेटिव्ह असून ०३ पॉझिटिव्ह आहेत. यांतील एक रुग्ण बरा झाला असून जिल्ह्याचे सिमेतून मार्गक्रमण करणारा उत्तर प्रदेश येथील एक ट्रकचा वाहक हा उपचारा दरम्यान मृत्यू पावला होता. तर त्याच ट्रकचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या चालकाची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास सोनटक्के यांनी दिली आहे. 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------



No comments

Powered by Blogger.