Header Ads

संकटकाळात गोरगरीब व गरजुंचे मदतीसांठी कारंजा मनसे सरसावली

संकटकाळात गोरगरीब व गरजुंचे मदतीसांठी कारंजा मनसे सरसावली 


११ दिवसांपासून मनसे सैनिक किराणा किट देऊन करीत आहेत मदत

आतापर्यंत ३७० गरजू परिवारांना केले वाटप

सहकारी मित्रांसह अनेक समाजसेवी लोकांचाही सहयोग - अमोल लुलेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष 


कारंजा (जनता परिषद) दि.१५ - आज संपूर्ण जग कोरोना रोगामुळे आर्थीक संकटात सापडला आहे. आपले देशात लॉकडाऊनचे काळात सर्व उद्योग-धंदे बंद असल्याने हाताला काम नाही त्यामुळे हातावर जगणे असणार्‍यांकडे पैसे नाहीत. यामुळे मुलाबाळांचे परिवाराचे पोट कसे भरणार या भिमकाय प्रश्‍नाने हातमजूरी करणारे, अपंग, निराधार अशा अतिशय गरजू व्यक्तींना मदतीची खरी गरज आहे. कारंजा शहर व ग्रामीण भागात अशा अपंग, निराधार व हातावरचे जिणे असलेल्यांची संख्या ही खुप मोठी आहे. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे माध्यमातून पक्षश्रेष्ठी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कारंजा येथे मनसे अशा या लोकांचे मदतीसाठी धावून गेली आहे. गत ११ दिवसांपासून मनसेचे हे सैनिक आवश्यक तिथे स्वत:हून पोहोचून किराणा किटचे वितरण करीत आहेत. १५ दिवस पुरेल असा संपूर्ण किराणा गरजू परिवारांपर्यंत पोहोचविण्याचे यथार्थाने मानवीय असे कार्य हे मनसे सैनिक करीत आहेत. आता पर्यंत गोरगरीब, गरजू , अपंग, निराधार अशांना ३७० किटचे वाटप करण्यात आले आहे. 
मनसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर सह मनविसे उपजिल्हा संघटक कपील महाजन, तालुका संघटक भालचंद्र शामसुंदर यांचेसह मनसे सैनीक रवी राऊत, चेतन सोनीवाल, शेखर जिरापूरे, अमोल चौधरी, हेमंत येवतकर, गजानन बोरेकर व इतर अनेक कार्यकर्ते रोज उपस्थित राहून मेहनत घेऊन या समाजकार्यात आपले सहकार्य देत आहेत. 
आमचे नेते राज ठाकरे यांच्या आदेशानुसार परिसरातील गोरगरीब, गरजू, अपंग, निराधार यांची मदत करण्याचा विचार कारंजा मनसेने घेतला व त्यानसुार संपूर्ण मित्र परिवाराचे सहकार्याने किराणा किट देऊन मदत करण्याचे कार्य मनसेचे सैनीक करीत असल्याची माहिती मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर यांनी दिली. मित्र परिवार सह अनेक समाजसेवी लोकही या कार्यात या मनसे सैनीकांसोबत जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. 




No comments

Powered by Blogger.