Header Ads

वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधित ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधित ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

रुग्नाला होता अतिजोखीमेचा मधुमेह आजार 


     वाशिम (जनता परिषद) दि. २७ - जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका ६५ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा काल, २६ मे रोजी रात्री ११ वा. दरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला मधुमेह हा अतिजोखमीचा आजार होता.

     मुंबई येथून आलेल्या कोरोना बाधित महिलेसोबत प्रवास केलेल्या ५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून यापैकी ६५ वर्षीय व्यक्तीला गेल्या चार दिवसांपासून कृत्रिमरित्या ऑक्सिजन देवून डॉक्टरांचे पथक उपचार करीत होते. मात्र, काल त्याची प्रकृती बिघडली, दुर्दैवाने रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.