Header Ads

कारंजात मुख्य व संवेदनशिल मार्गाने पोलिसांचा रुट मार्च

कारंजात मुख्य व संवेदनशिल मार्गाने पोलिसांचा रुट मार्च 

नागरिकांनी पुष्पवर्षा करीत व टाळ्या वाजवून व्यक्त केली कृतज्ञता 



कारंजा (जनता परिषद) दि.२३ -  आज दिनांक २३ मे रोजी सायंकाळी ७.०० वाजता चे दरम्यान शहरातील मुख्य व संवेदनशील भागातून रुट मार्च काढण्यात आला. आगामी रमजान ईद उत्सवाचे निमित्ताने शहरातील शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, बिबीसाहबपुरा, मंगलवारा, अस्ताना, दत्त चौक, टिळक चौक, सुभाष चौक तसेच मिश्र वस्तीतून संवेदनशील मार्गाने हा रुट मार्च काढण्यात आला. कारंजा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील प्रमुख उपस्थितीत व कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वात ५ अधिकारी, ४० कर्मचारी आरसीपी प्लाटून व १८ होमगार्ड सैनिक यांनी या रुट मार्च मध्ये सहभागी होते.  रमजान ईद दरम्यान घरीच नमाज पढन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाचे वतीने करण्यात आले. 

नागरिकांनी पुष्पवर्षा करीत व टाळ्या वाजवून व्यक्त केली कृतज्ञता 

पोलिसांच्या या पथसंचलन दरम्यान मारवाडीपुरा, नेवीपुरा या भागात पोलिसांवर पुष्पवर्षा करीत तसेच टाळ्या वाजवून नागरिकांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी बांधवांचे अभिनंदन व स्वागत केले. स्वत:चे जिव धोक्यात घालून भर उन्हात जनतेचे जिवित्वाचे रक्षण करणेचे कामाबाबत व कर्तव्याबाबत आपली देशाचा एक नागरिक  म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे निश्‍चितच पोलिस विभागाचे मनोबलही वाढले आहे. 

No comments

Powered by Blogger.